Yashomati Thakur Bike Rally Amravati : यशोमती ठाकूर बाईकवर स्वार!अमरावतीत जोरदार शक्तिप्रदर्शन

Continues below advertisement

Yashomati Thakur Bike Rally Amravati : यशोमती ठाकूर बाईकवर स्वार!अमरावतीत जोरदार शक्तिप्रदर्शन 

तिवसा विधानसभा मतदार संघात आज काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी आपली उमेदवारी शक्ती प्रदर्शन करत दाखल केली.. यावेळी सुरुवातीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेत मोझरी ते तिवसा पर्यंत बाईक रॅली काढली.. त्यांनतर जाहीर सभा झाली ज्यामध्ये राष्ट्रीय कुस्तीपटू विणेश फोगाट ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या.. सभा झाल्यावर यशोमती ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.. यावेळी बीफार्म त्यांनी जोडला नाही.. उद्या एबी फार्म देणार असल्याचं यशोमती ठाकूर म्हणाल्या.. यावेळी एबीपी माझाशी प्रतिक्रिया देताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, आम्ही संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक लढत आहो.. भाजप आणि सहकारी संविधान संपवताय.. उमेदवारी घोषीत झाली नाही पण मी अर्ज भरला आहे सायंकाळ पर्यंत घोषित होईल असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.. 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram