Yashashree Shinde Murder News : नकार होकारात बदलला नाही म्हणून मित्र Dawood Shaikh याच्याकडून हत्या
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppYashashree Shinde Murder News : नकार होकारात बदलला नाही म्हणून मित्र Dawood Shaikh याच्याकडून हत्या
यशश्रीने लग्नाला नकार देत असल्यानं दाऊद शेखनेचं तिला संपवल्याचं पोलिस तपासात उघड झालंय. मागील दोन दिवसांपूर्वी आरोपीला कर्नाटकातून बेड्या ठोकण्यात आल्यात. दरम्यान पोलिस तपासात दाऊदने आपल्या गुन्ह्याची कबुली दिलीय. आऱोपीला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टात काय झालं? आरोपीने आपल्या कबुली जबाबात काय म्हटलं? नेमकं हे प्रकरण काय? हेच या व्हिडीओत पाहणार आहोत.
उरणमध्ये झालेल्या हत्याकांडानं संपू्र्ण महाराष्ट्र हादरुन गेलाय. उरणची राहणारी यशश्री शिंदे हिची तिचा मित्र दाऊद शेखने धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली.
या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. 30 जुलैला पोलिसांनी आरोपीली कर्नाटकातील गुलबर्ग्यातून अटक केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी दाऊद बोलता झाला. त्यांने यशश्रीला का मारलं? हत्येआधी दोघांमध्ये काय घडलं? याबाबत धक्कादायक खुलासे केलेत.