Worli Hit and Run : वरळी हिट अँड रन प्रकरण, आरोपी मिहिर शाहाच्या मैत्रिणीला घेतलं ताब्यात

Continues below advertisement

Worli Hit and Run : वरळी हिट अँड रन प्रकरण, आरोपी मिहिर शाहाच्या मैत्रिणीला घेतलं ताब्यात वरळीतील (Worli News) हिट अँड रन प्रकरणात (Hit And Run Case) अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणी शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेच्या (Shiv Sena) उपनेत्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वरळीत (Worli Police) महिलेला आपल्या गाडीखाली चिरडून फरार होणारा आरोपी शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते राजेश शहा (Rajesh Shaha) यांचा मुलगा असल्याचंही पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांकडून सध्या आरोपीचा शोध सुरू आहे. अपघात झाला त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू गाडीत (White BMW Car) आरोपी मिहीर शहा (Mihir Shaha) आणि ड्रायव्हर असल्याचंही पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलिसांकडून मिहीर शहाचा कसून तपास सुरू आहे.   शिंदेंच्या शिवसेनेचे पालघरचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहानं आपल्या पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू कारनं एका महिलेला चिरडलं आणि अपघातानंतर तिथून पळ काढला. पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध सुरू होता. पोलिसांनी याप्रकरणी मिहीरचे वडील शिंदेंच्या शिवसेनेचे पालघरचे उपनेते राजेश शहा यांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस महिरीच्या मागावर असून त्याचा कसून शोध घेत आहेत.   अपघातानंतर गोरेगावला गर्लफ्रेंडच्या घरी पोहोचला, तिथून मोबाईल बंद करुन फरार वरळी हिट अॅड रन प्रकरणात वरळी पोलिसांकडून तपासासाठी वाहनाच्या इन्स्पेक्शनसाठी आरटीओ आणि फॉरेन्सिक टिम बोलावलेली आहे. पोलीस मुख्य आरोपी मिहीरच्या मागावर असून त्याचं लोकेशन ट्रेस करत आहेत. अपघात झाल्यानंतर घाबरलेल्या आरोपी मिहीरनं घटनास्थळावरुन पळ काढला. त्यानंतर त्यानं गोरेगावला राहत असलेल्या गर्लफ्रेंडचं घर गाठल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. वरळी पोलिसांनी मिहीरच्या वडिलांपाठोपाठ गर्लफ्रेंडलाही ताब्यात घेतलं आहे. गोरेगांवहून सकाळी आठ वाजता आरोपी मिहीर गर्लफ्रेंडच्या घरातून वांद्र्याला मित्राकडे जातो, असं सांगून निघाला. त्यानंतर त्यानं त्याचा फोन बंद करुन टाकला. दरम्यान, वरळी पोलिसांचं आणखी एक पथक वांद्र्याला रवाना झालं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram