World's Smallest Ganesh Idols | मायक्रोस्कोपने दिसणारे सोन्याचे बाप्पा, 'भगवानदास खरोटे' यांचा 'World Record'!
राज्यभरात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. याच गणेशोत्सवातील एका अद्भुत कलाकृतीची चर्चा सध्या सुरू आहे. गणपती बाप्पाची सर्वात छोटी मूर्ती पाहण्यासाठी मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. 0.76 इंच ते 1 इंच उंचीच्या सोन्यातील या बाप्पांच्या मूर्ती आहेत. कांगी टेन गणेश, मौखिक मौती गणेश, वरद विनायक गणेश यांसारखी गणेशाची विविध रूपे सोन्याच्या धातूत तयार करण्यात आली आहेत. भगवानदास खरोटे या कलाकाराने ही कलाकृती साकारली आहे. यापूर्वी डाळीच्या दाण्यावर केलेल्या कलाकृती खराब झाल्याने त्यांनी सोनं हे माध्यम निवडले. चाय वाले बाप्पा, संगीत वाद्य घेऊन गाजतलेले बाप्पा, हार्मोनियम वाले बाप्पा अशा विविध रूपांतील मूर्ती आहेत. या मूर्तींसोबत जगातले सगळ्यात छोटे तबला, पेटी, सनई, चौघडा ही वाद्येही आहेत. 'सोळाशे इंचांमध्ये दोनशे छप्पन्न गणेश मूर्ती बनवण्याचा मी जागतिक विक्रम केलेला आहे ज्यामध्ये प्रत्येक जनप्रति एक साइजचा आहे आणि सर्व बाप्पांचे स्वरूप वेगवेगळं आहे,' असे कलाकाराने सांगितले. विविध सौंदर्यभाव असलेल्या या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी होत आहे.