Mumbai-Goa Highway Traffic | गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासात कोंडी, रखडलेल्या कामांमुळे त्रास

मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामांमुळे कोकणवासियांना सातत्याने त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात गेलेले लाखो गणेशभक्त आणि मुंबईकर कोकणवासीय आता मुंबईत परतण्यास निघाले आहेत. परतीच्या प्रवासात त्यांना मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. माणगाव आणि इंदापूर या शहरांजवळ सकाळपासूनच वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. रखडलेल्या बायपासचा प्रश्न आणि महामार्गाची दुरावस्था ही या वाहतूक कोंडीची मुख्य कारणे आहेत. "मुंबईगोवा हायवेचा हा प्रश्न गेली दह ते पंधरा वर्षे काही सुटेन. सरकारने ही एकच विनंती राहील की हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा," असे प्रवाशांनी म्हटले आहे. गेली 10-15 वर्षे हा प्रश्न प्रलंबित असून, कोकणवासियांना या त्रासातून कधी मुक्ती मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रवाशांना वाहतूक कोंडीमुळे दोन तास अधिक लागले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola