Kolhapur Sangli Flood : कोल्हापूर,सांगली पूर व्यवस्थापन प्रकल्पाला जागतिक बँकेचं अर्थसहाय्य
Continues below advertisement
कोल्हापूर,सांगलीतील पूर व्यवस्थापन आणि पावसाळ्यातलं अतिरिक्त पाणी मराठवाड्यात आणण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास जागतिक बँक अर्थसाहाय्य करणार आहे. १२ सप्टेंबर २०१९ रोजी जागतिक बँकेच्या पथकाने पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा झाली. पूरग्रस्त भागातील पाणी दुष्काळी भागात वळवण्याची ही योजना आहे. कृष्णा-भीमा नदी खोऱ्यात प्रगत तंत्रज्ञानाद्वारे कामे होतील. पूररेषा आखणे, नदी खोलीकरण, गाळ काढणे अशी अनेक कामे हाती घेण्यात येणार आहेत.
Continues below advertisement