Padma Awards 2020 | माझ्या नेक कामाचा हा पुरस्कार : राहीबाई पोपेरे | ABP Majha
अहमदनगरातील राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालाय. राहीबाई यांना आदिवासी भागात बीज संरक्षण आणि संवर्धनासाठी उल्लेखनीय काम केले आहे. त्याच कामाचे फळ म्हणून त्यांना पद्मश्री जाहीर झालाय. या पुरस्काराबद्दल त्यांनी समाज-शासनाबद्दल समाधान आणि आनंद व्यक्त केलाय. एबीपी माझाशी बोलतांना त्यांनी भविष्यात आदिवासी भागातील निसर्ग संपत्तीचे जतन आणि संवर्धन केलं जाईल असा विश्वास व्यक्त केलाय.