Buldhana : धक्कादायक! कॅल्शियमच्या नावाखाली माती खाण्याची सवय
Continues below advertisement
माती हा आपल्या संस्कृतीचाच भाग आहे. एका शेतकऱ्याचं उभं आयुष्य हे काळ्या आईची काळजी घेण्यात जातं. महाराष्ट्राची ओळख असलेल्या कुस्तीचा पाळमुळं ही लाल मातीत घट्ट रुतलेली आहेत. आपल्या जन्मभूमीच्या आणि कर्मभूमीच्याही मातीवर आपण सारेच प्रेम करतो. कारण त्याच मातीतून आपल्याला अन्न मिळतं. मातीनं आपलं घर उभं राहतं. पण त्याच मातीतून नशाही येते असं कुणी म्हटलं तर ? हो अलीकडेच काही महिला, लहान मुलं आणि वृद्धांनाही माती खाण्याचं व्यसन जडल्याचं धक्कादायक वास्तव उघडकीस आलं आहे. कसं ते पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Continues below advertisement