Maharashtra Winter Session : राज्य शासनाचं हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार, निर्णयावर शिक्कामोर्तब
मुंबई : राज्य शासनाचं हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब झाले असून 22 ते 28 डिसेंबर या कालावधीत अधिवेशन प्रस्तावित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते अजूनही रुग्णालयातच उपचार घेत आहेत. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला ते ऑनलाईन उपस्थित होते.