Wine : Supermarket , General Stores मध्ये वाईन विक्रीला परवानगी मिळणार? मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव
Continues below advertisement
राज्यात नवी वाईन पॉलिसी राबवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे आणि त्यादृष्टीनं राज्य सरकारनं आणखी एक पाऊल पुढे टाकलंय. राज्यातल्या सुपर मार्केट, जनरल स्टोअर्समध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्यासंदर्भातला प्रस्ताव आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेला येणार आहे. वाईन उद्योगाचा विस्तार १ हजार कोटींपर्यंत पुढील पाच वर्षात वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यादृष्टीनं आता राज्य सरकानं पावंलं टाकायला सुरुवात केलेय. मात्र वाईनच्या खुल्या विक्रीच्या प्रस्तावाला भाजपकडून विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय चर्चा होते हे पाहावं लागेल.
Continues below advertisement