Weather Update : परभणीचे नागरिक गार वाऱ्यांनी हैराण, राज्यात थंडीचा कडाका कायम : ABP Majha

उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात आलेली थंडीची लाट आजही कायम राहण्याची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यात तापमानात मोठी घसरण झाली असून तापमान 2.8 अंश नोंदवण्यात आलंय. तिकडे परभणी जिल्ह्यातही तापमानातली घट कायम आहे. आज 8.3 अंश तापमान नोंदवण्यात आलंय. तिकडे नंदुरबारमध्येही हुडहुडी भरलेय. डोंगराळ भागात पारा 4 अंशांपर्यंत घसरलाय  थंडी आणि गार वाऱ्यांमुळे नागरिक हैराण आहेत. या थंडीचा परिणाम रबी पिकांवर होतान दिसतोय. पपई उत्पादक शेतकरीही थंडीमुळे हवालदिल झाले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola