Kolhapur : गावकऱ्यांना स्वर्गमंडप कोसळण्याची भीती; कोल्हापूरचा प्राचीन वारसा धोक्यात!

कोल्हापुरातील स्थापत्य कलेचा अप्रतिम वारसा असलेलं, खिद्रापूर येथील प्राचीन कोपेश्वर शिवमंदिर धोक्यात आलंय. या प्राचीन शिवमंदिराला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. मंदिरातील 20 दगडी खांबांना तडे गेलेत. सोबतच पर्यटक आणि अभ्यासकांना भुरळ घालणाऱ्या स्वर्गमंडपाचे खांबही धोक्यात आहेत. मंदिरातील स्वर्गमंडप कोसळण्याची भीती आता गावकऱ्यांना वाटतेय. गेल्या दोन्ही महापुरात हे मंदिर पूर्ण पाण्याखाली गेल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केलाय. या मंदिराच्या अवस्थेकडे तातडीने लक्ष देऊन मंदिराची पडझड थांबवण्याची मागणी गावकऱ्यांनी केलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola