Legislature Winter Session : विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार?
मुंबई : विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 7 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. हिवाळी अधिवेशन हे नेहमी नागपूरमध्ये होत असतं, मात्र, यावर्षी हे अधिवेशन मुंबईत होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे सध्या महाराष्ट्रात असलेली कोरोनाची परिस्थिती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती. त्यामुळे हे अधिवेशन मुंबईत होण्याची दाट शक्यता आहे.