Uddhav Thackeray | 'थिल्लर' गोष्टींकडे बघण्यास वेळ नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सवंग लोकप्रियतेसाठी किंवा टाळ्या मिळाव्यात म्हणून मदतीची घोषणा करणार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद येथील पत्रकार परिषदेत केलं आहे. मुख्यमंत्री सध्या अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करत आहे. याचवेळी जे कोण थिल्लर चिल्लर आहेत, मला त्यांच्याकडे बघायला वेळ नाही असे म्हणत विरोधीपक्षनेत्यांनाही टोला लगावला आहे.