Andheri Election BJP : राज ठाकरेंची विनंती भाजप ऐकणार? ABP Majha

अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी आता भाजपवर दबाव वाढताना दिसतोय.. राज ठाकरे यांनी भाजपनं ही निवडणूक न लढवता बिनविरोध करावी अशी विनंती करणारं पत्र लिहिलं होतं, त्यानंतर आज दिवसभर याचे राजकीय पडसाद ही उमटले होते... शरद पवारांनी देखील तातडीनं पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणारं नाही म्हणत उमेदवारी देऊ नये अशी इच्छा व्यक्त केली आणि आता त्यानंतर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीदेखील 
एकनाथ शिंदेंना पत्र लिहून अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केलीय. दरम्यान या सर्व घडामोडींनंतर भाजप नेत्यांची देवेंद्र फडणवीस यांच्या घरी रात्री बैठक होणारेय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola