भाजपाने कर्नाटकचा मुख्यमंत्री का बदलला? माजी मुख्यमंत्री एसआर बोम्मईंचे पुत्र बसवराज नवे मुख्यमंत्री
कर्नाटक : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची कमान कोणाकडे जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून कर्नाटकाच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बोम्मई यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.