Amravati Violence : महाराष्ट्रात दंगे काणी भडकवले? त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रातच का?

Maharashtra Tripura violence : त्रिपुरात एका समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराविरोधात महाराष्ट्रात दोन दिवसांपासून आंदोलनं सुरु आहेत. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. अमरावती, नांदेडसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडत आहेत. यामध्ये अनेकजण जखमीही झाले आहेत. या घटनेनंतर राज्यातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. राज्यातील सरकारचं हे अपयश असल्याचं म्हणत विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलाय. तर राज्यात दंगली घडवून सरकार अस्थिर करण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप सत्ताधारी महाविकास आघाडीनं केलाय. पण बांगलादेशमध्ये आणि नंतर त्रिपुरात घडलेल्या घटनेमुळे महाराष्ट्र का पेटला? 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola