सुक्या मेव्याचे भाव का वाढले? Afghanistan च्या परिस्थितीचा व्यापाऱ्यांकडून फायदा?

Continues below advertisement

मुंबई : अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचे साम्राज्य आल्याने याचा परिणाम सुक्या मेव्यावर  होताना दिसत आहे. अफगाणिस्तानमधून मोठ्या प्रमाणात सुक्या मेव्याची आवक वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये होत असते. मात्र आता तालिबानने अफगाणिस्तानमध्ये घातलेल्या उन्मादामुळे सुक्या मेव्याची आवक मंदावणार असल्याने दरात वाढ होताना दिसत आहे. 

भारतात अफगाणिस्तानातून वर्षांला 38 हजार 650 लाख डॉलरची उलाढाल सुक्या मेव्याची होत असते. सुक्यामेव्याचे बाजारभाव मार्केटमध्ये वाढले असून तालिबानच्या नावाखाली मुंबई एपीएमसी बाजारात सुकामेव्याचे बाजारभाव व्यापाऱ्यांनी वाढवले आहेत. अद्याप जुनाच सुकामेवा बाजारात असून  नविन माल न आल्याने येणाऱ्या सणासुधीच्या काळात याची कमतरता भासणार आहे. गणपती, दसरा, दिवाळी सणाच्या दरम्यान अफगाणिस्तानमधील सुक्या मेव्याची आवक सुरळीत न राहिल्यास भाव गगनाला भिडण्याची शक्यता आहे. बंद पडलेले अफगाणिस्तानातील बँकिंग क्षेत्र सुरू झाल्यास  पुन्हा माल येण्यास सुरुवात होईल अशी आशा एपीएमसी मधील व्यापारी वर्गाला आहे. सध्या 10 ते 15 टक्यांची भाववाढ सुक्या मेव्या मध्ये झाली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram