'सह्याद्री देवराई'ला परवानगी का नाकारली? तीन वर्षांपूर्वी परवानगी, मग आत्ताच काय झालं?
Continues below advertisement
सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई संस्थेला सातारमधील म्हसवे गावातील पोलीस दलाच्या जागेत झाडे लावण्याची परवानगी तीन वर्षांपुर्वी मिळाली. ही परवानगी सातारा पोलीस अधीक्षक आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडून देण्यात आली होती. त्यानंतर सातारा जिल्ह्य़ात पोलीस अधिक्षक म्हणून काम करणाऱ्या तीन पोलीस अधीक्षकांनी ही परवानगी कायम ठेवली.
Continues below advertisement