Who is Swapnil Kusale : Paris 2024 Olympics आई सरपंच, वडील शिक्षक,कोल्हापूरच्या स्वप्नीलचा जगात डंका

Continues below advertisement

Who is Swapnil Kusale : Paris 2024 Olympics आई सरपंच, वडील शिक्षक,कोल्हापूरच्या स्वप्नीलचा जगात डंका

कोल्हापूरच्या पठ्ठ्यांनं राधानगरीत कांस्य पदक खेचून आणलंय. नेमबाजीत कांस्य पदक जिंकत पठ्ठ्यांनं देशाचं नाव जगभरात उंचावलं. पॅरिसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत स्वप्नील कुसाळे यांने दमदार खेळी खेळत बाजी मारलीये.  50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात  स्वप्नीलने कांस्य पदक पटकावलं आहे.

जितका मोठा स्वप्नीलचा विजय आहे. तितकाच मोठा त्याचा संघर्ष देखील आहे. मागील 10-12 वर्षांपासून स्वप्नील अहोरात्र मेहनत घेतोय. स्वप्नीलला इथंपर्यंत पोहचवण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी मोठे कष्ट घेतलेत. सरावासाठी देखील स्वप्नीलकडे पैसे नव्हते. नेमबाजीसाठी लागणाऱ्या बुलेट अर्थात नेमबाजीच्या गोळीची किंमत त्यांच्या अवाक्या पलीकडची होती. सरावासाठी स्वप्नीलच्या वडिलांनी बँकेकडून कर्ज काढून सरावासाठी एक-एक पई जमा केली..आणि वडिलांच्या याच कष्टांचं पठ्ठ्यानं चिज केलंय.  स्वप्नीलच्या पराक्रमाने कोल्हापूरकरांसह देशवासीयांच्या माना उंचावल्यात.स्वप्नीलचं सर्वत्र कौतुक होतय. त्याला वेगवेगळी पारितोषकं जाहीर होतायत.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram