OBC Morcha Nagpur : 'नक्षलवादा'चा आरोप असलेले Sachin Mali, Sheetal Sathe आता OBC आरक्षणासाठी मैदानात

Continues below advertisement
शाहीर सचिन माळी (Sachin Mali) आणि शीतल साठे (Sheetal Sathe) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, यावेळी ते ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) समर्थनार्थ मेळाव्यांमध्ये सहभागी होत आहेत. 'ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका', अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली असून जातीनिहाय जनगणनेची मागणीही त्यांनी उचलून धरली आहे. यापूर्वी कबीर कला मंचच्या (Kabir Kala Manch) माध्यमातून डाव्या विचारसरणीचा प्रचार केल्यामुळे आणि गडचिरोलीतील कथित वावरामुळे त्यांच्यावर नक्षलवादाशी संबंधित असल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली, त्यांच्यावर खटला चालला, परंतु पुराव्यांअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ते पुन्हा सामाजिक लढ्यात सक्रिय झाले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola