TOP 50 Superfast News : बातम्यांचं अर्धशतक : Maharashtra News : 10 OCT 2025 : ABP Majha
Continues below advertisement
नागपूरमध्ये (Nagpur) सकल ओबीसी समाजाचा (OBC Community) महामोर्चा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकारण तापले आहे. 'आम्हाला निवडून घ्यायचंय, त्यामुळे निवडणुकीत आम्ही काहीतरी आश्वासन देतो. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय,' असे अजब विधान बाबासाहेब पाटील यांनी केले आहे. नागपुरात, मराठा आरक्षणासंदर्भातील २ सप्टेंबरचा जीआर (GR) रद्द करण्याच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्चात विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar), लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि प्रकाश शेंडगे यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले. जीआर रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असा इशारा वडेट्टीवारांनी दिला, तर हा मोर्चा काँग्रेस पुरस्कृत असल्याची टीका मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे. दुसरीकडे, पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर (Kabul) एअर स्ट्राईक केल्याचा दावा केला आहे. तसेच, शिवसेना (UBT) आणि मनसे युतीच्या चर्चांना वेग आला असून, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याला दुजोरा दिला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement