Hemant Gawande Land Scam: खडसेंच्या भोसरी प्रकरणातील व्हिसलब्लोअर हेमंत गावंडेंवर जमीन घोटाळ्याचा ठपका
Continues below advertisement
पुण्यातील बोपोडी येथील सरकारी जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे विकल्याच्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे, तहसीलदार सूर्यकांत येवले आणि इतर सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 'हा सराईत गुन्हेगार असून, आपण त्याला विरोध केला म्हणूनच हेमंत गावंडे यांनी भोसरी प्रकरणात आपल्या विरोधात तक्रार दाखल केली होती,' असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, याच हेमंत गावंडे यांनी पूर्वी एकनाथ खडसे यांच्या भोसरी जमीन प्रकरणात व्हिसलब्लोअरची भूमिका बजावली होती, ज्यामुळे खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता स्वतः हेमंत गावंडे जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात आरोपी झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीचाही उल्लेख आल्याने याला राजकीय वळण लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement