Pune Land Scam:ज्यांनी खडसेंना अडकवलं तेच जाळ्यात, हेमंत गावडेंचा हिशोब Eknath Khadse चुकता करणार?
Continues below advertisement
पुण्यातील बोपोडी येथील सरकारी जमीन हडपण्याच्या प्रयत्नांच्या आरोपाखाली बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. 'आता एकनाथ खडसे, या हेमंत गावंडेंचा हिशोब चुकता करण्यासाठी पत्रकार परिषद घेणार आहेत', असे वृत्त आहे. विशेष म्हणजे, हे तेच हेमंत गावंडे आहेत, ज्यांनी २०१६ मध्ये तत्कालीन मंत्री एकनाथ खडसे यांच्या भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी व्हिसलब्लोअरची भूमिका बजावली होती, ज्यामुळे खडसेंना राजीनामा द्यावा लागला होता. आताच्या प्रकरणात, गावंडे यांच्या व्हिजन प्रॉपर्टीज आणि अमेडिया कंपनीवर तहसीलदार सूर्यकांत येवले यांना हाताशी धरून कृषी विभागाची साडेपाच हेक्टर जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे. एकेकाळी व्हिसलब्लोअर असलेले गावंडे आता स्वतःच जमीन प्रकरणात आरोपी झाल्याने, 'एक वर्तुळ पूर्ण झाले आहे' अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement