Pune Land Scam: 'कोणीही दोषी आढळला तरी कारवाई होईल', मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट इशारा
Continues below advertisement
पुण्यातील मुंढवा (Mundhwa) येथील जमीन घोटाळा (Land Scam) प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. 'चौकशीदरम्यान कोणाची नावं आली, त्यांचा संबंध आला तरी कारवाई होईल,' असे मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. जरी संबंधित जमीन व्यवहार दोन्ही पक्षांनी रद्द करण्यासाठी अर्ज केला असला तरी, दाखल झालेली फौजदारी केस (Criminal Case) मागे घेतली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणातील अनियमिततेला जो कोणी जबाबदार असेल, त्याच्यावर कारवाई निश्चित आहे आणि या भूमिकेशी उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) हे देखील पूर्णपणे सहमत असतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या प्रकरणी चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement