WhatsApp Security: हॅकर्सना बसणार दणका! एका क्लिकवर खाते होणार सुरक्षित, येतंय ‘Strict Account Setting’

Continues below advertisement
सायबर हल्ले आणि फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅपने (WhatsApp) ‘स्ट्रिक्ट अकाउंट सेटिंग्स’ (Strict Account Settings) नावाचे नवीन सुरक्षा फीचर आणले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, 'या फीचरमुळे वापरकर्त्यांची अकाऊंट सुरक्षा आणखी मजबूत होणार आहे'. हे फीचर सध्या आयओएस बीटा (iOS beta) आवृत्तीमध्ये तपासले जात असून ते लवकरच सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल. हे फीचर चालू करताच, अनोळखी नंबरवरून येणारे कॉल आपोआप सायलेंट होतील, अनोळखी लोकांकडून येणारे मीडिया आणि फाइल्स ब्लॉक होतील, संशयास्पद लिंकचे प्रीव्ह्यू दिसणार नाहीत आणि टू-स्टेप व्हेरिफिकेशन (Two-step verification) सारखी अनेक सुरक्षा सेटिंग्ज आपोआप सुरू होतील. कंपनीच्या मते, हे फीचर विशेषतः पत्रकार, कार्यकर्ते आणि सार्वजनिक व्यक्तींसाठी उपयुक्त ठरेल, कारण हे गट सायबर हल्ल्यांचे प्रमुख लक्ष्य ठरतात.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola