Maha Politics: 'युतीतच लढू', नारायण राणेंचा शब्द; वडील-मुलामध्ये मतभेद, नितेश राणेंचा स्वबळाचा नारा

Continues below advertisement
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून चर्चा सुरू असतानाच अनेक पक्षांनी स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. यातच कोकणातील राणे कुटुंबातील मतभेद समोर आले आहेत, जिथे भाजप आमदार नितेश राणे स्वबळावर लढण्यास इच्छुक आहेत. तर दुसरीकडे, त्यांचे वडील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 'सिंधुदुर्ग, रत्नागिरी मध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे' असे सांगत युतीचेच संकेत दिले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) बैठक पार पडली. दुसरीकडे, ठाकरे गटाने पुण्यात काही जागांवर स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे, तर अजित पवार यांनीही आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola