Shivsena VS Rane : शिवसेनेवर नारायणास्त्र, Narayan Rane शिवसेनेची कोणती प्रकरणं बाहेर काढणार?
नवनाथ बन
Updated at:
27 Aug 2021 08:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावण्याची भाषा केल्यानंतर नारायण राणे आणि शिवसेनेत जोरदार घमासान सुरु आहे आणि हे युद्ध जिंकण्यासाठी नारायण राणेंनी आता भात्यात राखून ठेवलेले बाण बाहेर काढायला सुरुवात केली. जनआशीर्वाद यात्रेचा रथ घेऊन रत्नागिरीत पोहोचलेल्या राणेंनी मोठा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली. आपल्या वहिनीवरती अॅसिड फेकायला कुणी सांगितलं होतं हे मला माहिती आहे, असं वक्तव्य करत राणेंनी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. मात्र हे वक्तव्य करताना राणेंनी ना कुणाचं नाव घेतलं, नाही तपशील उघड केला. टप्प्य़ाटप्यानं जुनी प्रकरणं बाहेर काढण्याचा इशारा राणेंनी दिला आहे.