Amit Shah यांनी बोलावलेल्या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली, महाराष्ट्राकडून काय मागणी केली गेली?

Continues below advertisement

CM Uddhav Thackeray Meets HM Amit Shah : नक्षलग्रस्त भागांचा विकास आणि नक्षलवाद्यांशी दोन हात करण्यासाठी राज्याला 1200 कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. आज नक्षलग्रस्त भागांमधील विकासाच्या बैठकीत गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केली आहे. 

 

बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आढावा घेण्यासाठी सांगितलं त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिस्थिती, नक्षलग्रस्त भागातील परिस्थिती आणि नक्षलग्रस्त भागांत कराव्या लागणाऱ्या सोयीसुविधा आणि त्यासाठी लागणारा खर्च याबाबतची आकडेमोड गृहमंत्र्यांसमोर मांडली. याबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी नक्षलग्रस्ता भागांत शाळा जास्तीत जास्त कशा वाढवता येतील, त्या भागांत सुरक्षा आणि पोलीस यंत्रणांना काम करताना अनेकदा नेटवर्कच्या समस्यांचा सामना करावा लागतो, त्यासाठी या भागांत जास्तीत जास्त मोबाईल टॉवर्स उभरण्याची गरज असल्याचं सांगितलं. या दोन गोष्टींमुळे या भागांत खूप उपलब्धता येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांसोबत या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे आणि पोलीस महासंचालकही यावेळी उपस्थित आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram