America दौऱ्यानंतर PM Narendra Modi भारतात परतले, दिल्लीत जंगी स्वागत
पंतप्रधान मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर होते. अमेरिका दौऱ्यावरुन परतल्यानंतर आज मोदींनी मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) 76व्या सत्राला संबोधित केलं. या सत्रात त्यांनी पाकिस्तान आणि इमरान खान यांचं नाव न घेता निशाणा साधला आहे. ते म्हणाले होते की, जे देश दहशतवादाचा आधार घेत आहेत, त्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की, यामुळे त्यांनाही धोका आहे. तसेच अफगाणिस्तानाचा वापर आपल्या स्वार्थासाठी कोणी करु नये, असा इशाराही मोदींनी यावेळी दिला.