OBC Reservation बाबत भाजपची काय भूमिका, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? BJP Devendra Fadnavis
Continues below advertisement
...तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका घेऊ नयेत : फडणवीस
बैठकीत जोपर्यंत आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका घेऊ नयेत अशी भूमिका आम्ही मांडली. मागच्या बैठकीतही आम्ही काही मुद्दे मांडले होते. यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद आला आहे. राज्य मागासा आयोगाच्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा गोळा करुन आणि ट्रिपलटेस्ट जी सुप्रीम कोर्टाने सांगितलीय. त्यानुसार कारवाई केली तर आपल्याला ओबीसीच्या जागा आपल्याला वाचवण्यता येतील. तरीही चारपाच जिल्ह्यात अडचण होईल. मात्र, इतर जिल्ह्यात काही अडचण येणार नाही. म्हणजे जवळपास साडेचार हजार जागा आपल्याला वाचवता येतील. आता आम्ही तात्काळ इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी राज्य मागास आयोगाला विनंती करण्यात यावी अशी मागणी आम्ही केली आहे.
Continues below advertisement