Covid Center Scam : कोव्हिड सेेटर घोटाळा प्रकरणी ईडीच्या धाडी, काय आहे प्रकरण? Abp Majha
abp majha web team
Updated at:
21 Jun 2023 02:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोना काळात मुंबईत जम्बो कोविड सेंटर सुरु करण्यासाठी विविध कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले. यामध्ये लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस यांना कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवण्याचे कंत्राट प्राप्त झालं. शिवाय कंत्राट प्राप्त करुन घेण्यासाठी या कंपनीने बनावट कागदपत्र बीएमसीकडे सादर केले असल्याचा आरोप आहे.. ही कंपनी संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर आणि त्यांच्या भागीदाराच्या नावावर आहे. कंपनीची स्थापना जून 2020 मध्ये झाली. डॉक्टर हेमंत गुप्ता, सुजीत पाटकर, संजय शाह ,राजू साळुंखे हे भागीदार आहेत. तर बीएमसीला सादर केलेल्या पार्टनरशिप डीड खोटी आणि बनावट असल्याच्या बाबी समोर आल्या आहेत, असा आरोप आहे