जीनोम सिक्वेंसिंग म्हणजे काय? कोविडच्या नवनव्या प्रकारांची चाचणी! एकाचवेळी 384 नमुन्यांची तपासणी
नेक्स्ट जनरेशन जीनोम सिक्वेसिंग ही पद्धती वापरुन विषाणूंचे जनुकीय सूत्र ओळखून एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय नमुन्यांची चाचणी करता येणे शक्य होते.
सध्याच्या कोविड – 19 विषाणू संसर्ग कालावधीत कोविड विषाणूचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. अशा स्थितीत जीनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करुन उपचारांना वेग देणे शक्य
अमेरिकेतील इलुम्निया या कंपनीने, अमेरिकेतीलच अल्ब्राईट स्टोनब्रिज ग्रुप (ए. एस. जी. - बोस्टन) या संस्थेच्या माध्यमातून एकूण 6 कोटी 40 लाख रुपये किंमतीचे दोन जीनोम सिक्वेसिंग संयंत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेला दान स्वरुपात दिले आहे.