Thackeray vs Shinde : शिवसेनेच्या अस्तित्वाच्या सर्वाच्च लाढईत नेमकं काय घडलं? जाणून घ्या
Continues below advertisement
Maharashtra Politics : जवळपास महिनाभरापासून राज्यात सुरू असलेला सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. युक्तिवादा दरम्यान एकनाथ शिंदे यांचे वकील अॅड हरीश साळवे यांनी काही कागदपत्रे सादर करण्यास वेळ मागितला. त्याशिवाय, त्यांनी एक आठवडा सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केली. मात्र, सरन्यायाधीश रमण्णा यांनी यावर बोलताना काही मुद्दे अतिशय घटनात्मक असल्याने तातडीने सुनावणी आवश्यक असल्याचे म्हटले. एक ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार असून घटनापीठाकडे हे प्रकरण जाणार का, याबाबतही त्याच दिवशी स्पष्टता येण्याची शक्यता आहे
Continues below advertisement
Tags :
Shivsena Sanjay Raut Uddhav Thackeray Eknath Shinde Supreme Court Kapil Sibal Harish Salve Abhishek Manus Singhvi