Mangalprabhat Lodha : निर्भया फंडाचं विरोधकांनी अडीच वर्षात काय केलं? आरोप करणं सोप्प आहे
Continues below advertisement
मुंबई उपनगर चे पालक मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज घाटकोपर मध्ये माझी मुंबई , स्वच्छ मुंबई अभियान ला हजेरी लावली.हाती झाडू घेऊन त्यांनी सहायक आयुक्त संजय सोनवणे , पालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सोबत घाटकोपर पूर्व चा रेल्वे स्थानक परिसर स्वच्छ केला. तसेच प्रभात फेरी मध्ये सहभागी होत जनजागृती ही केली.पथनाट्य आणि फलक यांच्या मार्फत माझी मुंबई स्वच्छ मुंबई अभियान बाबत जनजागृती केली.पालिकेत प्रशासक असला तरी फंड कमी नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.तर पोलीस निर्भया पथकाच्या गाड्या आमदारांच्या सुरक्षेसाठी लावण्यात आल्या आहेत या आरोपावर त्यांनी हे आरोप तथ्यहीन असल्याचे आणि अडीच वर्षे सरकार मध्ये होते त्यांनी निर्भयाच्या लोकांसाठी काय केले ते आधी सांगा असा सवाल त्यांनी केला आहे
Continues below advertisement
Tags :
Nirbhaya Government Ghatkopar Employees Guardian Minister Mangal Prabhat Lodha Mumbai Suburbs Two And A Half Years MIssion Majhi Mumbai Swachh Mumbai Assistant Commissioner Sanjay Sonawane Municipal Officers Prabhat Pheri Pathanthia Plaque