CORONA :गतवर्षात वाढलेले मृत्यू कोरोनाचेच असण्याची शक्यता, मुंबई मॉडेलमध्ये मृत्यू कमी नोंदवले गेले?
महाराष्ट्र शासनाकडून जन्म-मृत्यूची नोंद करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. या प्रक्रियेला civil registration system किंवा सीआरएस असे म्हणतात. या विभागात नोंदवलेल्या माहितीचा आम्ही गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा केला. त्यातून जे काही दिसतय त्याचीच ही सर्वात मोठी बातमी आहे. आमचा हा दावा नाही की आम्ही जे वाढलेले मृत्यू केवळ कोरोनामुळे झालेत. पण महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांची तुलना केली तर जो मृत्यूचा प्रचंड मोठं तांडव दिसतय त्यामागं कोरोनाचा असावा हे मानण्यास पुरेशी जागा आहे. राज्याचे निवृत्त आरोग्य महासंचलकांच्या मते गेल्या दीड वर्षात वाढलेले मृत्यू कोरोनाचे बळी आहेत.