![ABP News ABP News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/23/b5aaacf49f333a10be074c61a56ea5a9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=200)
PM US Tour : अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत, कमला हॅरिससह काही कंपन्यांच्या SEO शी चर्चा करणार
PM Modi US Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. भारतीय वेळेनुसार, मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. दरम्यान, काल (बुधवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेसाठी रवाना झाले होते. अमेरिकेत दाखल झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आता थेट पेंसिलवेनिया एवेन्यू येथील हॉटेल विलार्ड इंटरकॉन्टिनेंटलसाठी रवाना होणार आहेत. तसेच अमेरिका दौऱ्यादरम्यान, मोदी याच हॉटेलमध्ये राहणार आहेत.
23 सप्टेंबर रोजी अमेरिकेतील वेळेनुसार, सकाळी 9.40 वाजता (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:15 वाजता) पंतप्रधान मोदी आपल्या हॉटेलमध्ये वेळवेगळ्या CEO सोबत भेटीगाठी करतील. यामध्ये क्वॉलकॉमचे अध्यक्ष आणि CEO, अॅडॉबचे चेअरमन, फर्स्ट सोलरचे CEO, जनरल अॅटॉमिक्सचे चेअरमन आणि CEO आणि ब्लॅकस्टोनचे संस्थापक यांचा सहभाग असेल.