मुद्दा पैशांचा नाही, स्वाभिमानाचा आहे; चंद्रकांतदादांच्या सल्ल्यावर संजय राऊतांचं प्रत्युत्तर
Continues below advertisement
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या चर्चा आहे, सव्वा रुपयांची. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर संजय राऊतांनी अब्रू नुकसानीच्या दाव्याची किंमत वाढवावी असा सल्ला राऊतांना दिला होता. अशातच आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी स्वाभिमान आणि सन्मानाला किंमत नसते, मग तो एक हजार कोटींचा असो किंवा सव्वा रुपयांचा. प्रश्न स्वाभिमानाचा आहे, त्यामुळे किंमत वाढवून घ्या, या चंद्रकांत पाटलांच्या मागणीला काहीच अर्थ नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत. यासोबतच माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
Continues below advertisement