Khed Shivapur Road | खेड-सातारा महामार्गाचं काम पूर्ण झालं नाहीतर 'टोलबंद' | ABP Majha
पुणे-सातारा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मार्गात येणाऱ्या खेड-शिवापूर टोल नाक्याचा अडथळा आता दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे ते सातारा दरम्यान रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाचं काम येत्या जानेवारी महिन्यापर्यंत पूर्ण झालं नाही तर खेड शिवापूर टोलनाका बंद करण्याचा प्रस्ताव सरकारला पाठवणार आहे, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.