Web Exclusive | संघर्षातून यश मिळवणारी नागपूरची जिगरबाज विद्यार्थिनी अंजली तिडके
आपल्यापैकी अनेक जण विपरीत परिस्थितीसमोर हात टेकुन निराश होतात... तर काही जण परिस्थितीला दोष देत आपले अपयश झाकतात... मात्र मोजकेच जिगरबाज असे असतात जे विपरीत परिस्थितीशी संघर्ष करत मोठे यश पदरात पाडतात...
अशीच एक जिगरबाज आहे नागपूरची विद्यार्थिनी अंजली तिडके... नागपूरच्या शांतीनगर परिसरातील विनायकराव देशमुख शाळेची विद्यार्थिनी अंजली तिडके ने दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवत 97.4 टक्के गुण मिळविले आहे... चौकीदार असलेले वडील आणि कापडी पिशव्या शिवून विकणाऱ्या आई अशी कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील अंजलीने या यशासाठी मोठी मेहनत घेतली आहे.. दिवसा शाळा, संध्याकाळी घरची कामे आणि रात्री उशिरा कुटुंबीय झोपल्यानंतर अभ्यास असे दिनक्रम असलेल्या अंजलीने वर्षभर नियोजनबद्ध पद्धतीने सातत्यपूर्ण अभ्यास केले..
दर आठवड्यात शाळेत शिकवलेल्या अभ्यासक्रमाची शनिवारी आणि रविवारी उजळणी घेत तिने स्वतःला परीक्षेसाठी तयार केला.