शरद पवारांच्या पाठोपाठ भाजप पोलखोल सभा घेणार, चंद्रकांत पाटलांकडून पवारांच्या वक्तव्याला उत्तर
कोल्हापूर : ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणावरून राज्यभर बाजू मांडण्यासाठी राज्यभर सभा घेणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.मात्र जनतेला खोटं सांगण्यासाठी पवार साहेब सभा घेत असतील तर त्यांच्या पाठोपाठ राज्यभर भाजपकडून पोलखोल सभा देखील घेतल्या जातील, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.