Web Exclusive : महिला अत्याचार, जादूटोणावर जनजागृती, अमरावती पोलिसांचा अनोखा उपक्रम : ABP Majha

Continues below advertisement
राज्यात प्रथमच अमरावती ग्रामीण पोलिसांकडून महिला अत्याचार, जादूटोणाबाबत संपूर्ण जिल्ह्यात ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येत आहे. महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढ होत असल्याच्या घटना पोलीस प्रशासनाचे निदर्शनात येत आहे. त्यामुळे अमरावती ग्रामीण जिल्ह्यामधे सायबर क्राईम बद्दल जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. ही मोहीम अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन यांचे संकल्पनेतून तयार झालेली आहे. यावेळी एक व्हिडिओ बनविला असून तो व्हिडीओ गावा-गावात दाखविल्या जात आहे. लोकांमध्ये महिला अत्याचार बद्दल जनजागृती व्हावी आणि गुन्हाचे प्रमाण कमी व्हावे त्यासाठी ग्रामीण पोलीस आणि सायबर सेलकडून जिल्ह्याच्या प्रत्येक ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील आठवडी बाजारात दोन पोलीस वाहनात एलईडी स्क्रीनद्वारे महिला अत्याचार, जादूटोणा गुन्हा कसा होतो यावर काय उपाययोजना करणे आवश्यक आहे आणि त्यापासून कशा प्रकारे बचाव करावा, या बद्दल चित्रफित दाखवून लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे, हा प्रयोग राज्यात पहिल्यांदाच होत असल्याने ग्रामीण पोलिसांचं कौतुक होत आहे तर नागरिकांकडून ही याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram