Web Exclusive | मराठवाड्यातील सिग्मा हॉस्पिटलमध्ये पहिली रोबोटिक सर्जरी
रोबोटिक सर्जरीला वैद्यकीय क्षेत्रातील भविष्य म्हणून पाहिलं जातं. परंतु, ही शस्त्रक्रिया करण्यासाठी पुणे-मुंबईशिवाय पर्याय नव्हता. मात्र, आता मराठवाड्यात पहिल्यांदाच रोबोटद्वारे ही शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शहरातील सिग्मा ग्रुप ऑफ हॉस्पिटलने मराठवाड्यात पहिल्यांदाच रोबोटिक सर्जरी युनिट सुरू केले आहे. त्यामुळे भविष्यात आता रोबोटद्वारे शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबईत जाण्याची गरज पडणार नाही.