CM-PM Meeting : मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा, पंतप्रधानांची भेट घेणार!

Continues below advertisement

मराठा आरक्षण प्रश्नी (Maratha Reservation)  आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)  यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची (PM Modi)  भेट घेणार आहे. मराठा आरक्षणाबरोबरच केंद्राकडे राज्याचे असलेली जीएसटीचे पैसे, तोक्ते चक्रीवादळात झालेले नुकसान आणि इतर मुद्दे या संदर्भात हे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. आज सकाळी अकरा वाजता ही भेट होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर असं शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला जाणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram