Web Exclusive : लोकांना गंडा घालणारा मनोहर मामा कसा लागला पोलिसांच्या हाती?
श्रद्धेचा बाजार मांडत फसवणूक करणारा भोंदूबाबा मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा सध्या सोलापूर पोलिसांच्या ताब्यात आहे. बुवाबाजी करत एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मनोहर मामाला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने 27 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचे इतर दोन साथीदार मात्र अद्याप ही फरार आहे. अटकेत असलेल्या या भोंदूबाबा मनोहर भोसलेने आणखी कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी न घाबरता पोलिसांत येऊन तक्रार द्यावी, असे आवाहन सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.