WEB EXCLUSIVE | आमदार देवेंद्र भुयार स्वाभिमानी शेतकरी संघटनेपासून दूर जात आहेत?

एका वर्षात मी पश्चिम महाराष्ट्रात गेलो नाही. कोणत्याही आंदोलनात सहभाग घेतला नाही. पण मी राजू शेट्टीच्या संपर्कात आहे,  असं स्पष्टीकरण आमदार देवेंद्र भुयार यांनी दिलं. "संघटनेच्या विस्तारासाठी जे मला प्रवास करायला पाहिजे ते मी सध्या करु शकत नाही. मी माझ्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करत आहे. राजू शेट्टी किंवा रविकांत तुपकर यांच्या कोणत्याच कार्यक्रमात फोटो नसल्याचा आरोप चुकीचा आहे. एका वर्षात स्वाभिमानी संघटनेचा कोणताच कार्यक्रम घेता आलं नाही पण जे कार्यक्रम झाले त्यावर राजू शेट्टी, रविकांत तुपकर यांचा बॅनरवर फोटो होते." बिल्ले न लावण्याचा कारण काय, यावर आमदार देवेंद्र भुयार म्हणाले की, "मी दोन बिल्ले लावत असतो. सध्या तर मला दोन बिल्ले लावावे लागत आहे एक विधानसभेचे आमदारचं आणि दुसरा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं."

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola