Aurangabad : औरंगाबादच्या लेबर कॉलनीत बुलडोझर कारवाई, जिल्हा प्रशासन ही जागा ताब्यात घेणार

Continues below advertisement

Aurangabad :  औरंगाबदच्या लेबर कॉलनी परिसरात मोडकळीस आलेली घरं जमीनदोस्त करण्यास सुरुवात झालीय. सकाळी साडेसहापासून ही पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह कारवाई सुरु झालीय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या ठिकाणी ३३८ घरं पाडण्यात येणार आहेत. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पाचशे पोलीस आणि दीडशे अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. या पाडकाम कारवाईसाठी ३०हून अधिक जेसीबी आणि कामगारांना पाचारण करण्यात आलंय. कारवाई दरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आलीय. आज दिवसभर या परिसराबाहेरील नागरिकांना इथं येण्यास मज्जाव करण्यात आलंय. इथल्या बहुतांशी नागरिकांनी घराचा ताबा सोडलाय. तर काही जण सोडण्याच्या तयारीत आहेत. मात्र तरीही काही नागरिक इथं राहत असून त्यांनी या पाडकामाला विरोध केलाय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram