Jayant Patil : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी संबंधित शिक्षण संस्थांवर महसूल विभागाची मेहरनजर?

Continues below advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी संबंधित शिक्षण संस्थेवर महसूल विभागानं मेहेरनजर केल्याचा आरोप होतोय. दैनिक लोकसत्तानं हे वृत्त दिलंय. रायगड जिल्ह्यातल्या शिरढोण इथली 14 एकर जमीन सांगली जिल्ह्यातील वाळवा इथल्या कासेगाव एज्युकेशन सोसायटी या शिक्षणसंस्थेला 2004 साली देण्यात आली होती. त्यासाठी 20 लाख रुपये संस्थेनं सरकारकडे जमा केले. ही जमीन ग्रामपंचायतीला हवी असल्यानं त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना या जमिनीपैकी दोन एकर जागा मुंबई महामार्गासाठी संपादित करण्यात आली आणि त्यासाठीचा 60 लाख रुपयांचा मोबदला कासेगाव एज्युकेशन सोसायटीला देण्यात आला. त्यामुळे सखोल चौकशी करण्याची मागणी शिरढोण ग्रामस्थ आणि शेतकरी कामगार पक्षाच्या काशिनाथ पाटील यांनी केलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram