Washim : आधी समजावून सांगा, नाही ऐकलं तर कानाखाली हाणा, वीज कर्मचाऱ्यांबाबत रविकांत तुपकर यांचं वक्तव्य
आधीच कोरोनाने अनेक नागरिकांचे नोकऱ्या हिरावल्यात, अनेक जण बेरोजगार झालेत. आजही अनेकजण घरी बसलेले आहेत. अशात सर्वसामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना महावितरण कंपनीकडून अव्वाच्या सव्वा बिले देण्यात येत आहेत. त्यात आता वीज कनेक्शन कापण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. वीज कापणीसाठी येणाऱ्या अधिकारी यांना आधि समजावून सांगा, तरीही ऐकत नसतील तर त्यांचे कपडे काढा व त्यांच्या कानाखाली हाणा, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केले. ते वाशिम येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी , कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असता बोलत होते.