URI : सुरक्षादलाचे जवान-दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री, तीन दहशतवाद्यांचा खात्मा, तिघेही पाकिस्तानी
Continues below advertisement
उरी : जम्मू -काश्मीरमधील उरीजवळील रामपूर सेक्टरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश मिळालंय. सीमेपलीकडून घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 3 दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने ठार केले. यानंतर मोठ्या प्रमाणात शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. यात पाच एके 47, 8 पिस्तूल आणि 70 हँड ग्रेनेडचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अलीकडेच दहशतवाद्यांनी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधून भारतीय सीमेत प्रवेश केला होता.
Continues below advertisement